महाराष्ट्र
श्री साईबाबाच्या चरणी सोन्याचे गुलाब अर्पण

0
0
4
2
4
0
श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात श्री साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. छत्तीसगड, दुर्ग येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती गितीका सहाणी यांनी ०१ लाख ५४ हजार २५३ रूपये किमतीचे सोन्याचे गुलाब फुल श्री साईचरणी अर्पण केले. १३.१०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुल श्री साईबाबांचे चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
0
0
4
2
4
0
