महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास शिर्डीत उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद

शिर्डी/ ( प्रतिनिधी) राज ठाकरे यांनी मनसे पक्षाच्या वर्धापन दिनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रायगडाच्या पायथ्याशी मनसे प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्घाटन सदस्य नोंदणीचा फार्म भरून केले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान गावोगावी तालुका वाड्या वस्तीवर सुरू झाले काहींनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली काहींनी ऑफलाइन सदस्य नोंदणी मध्ये नोंदणी केली खूप चांगला प्रतिसाद मिळाला राहाता शिर्डी कोपरगाव व अकोले तालुक्यात सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी हे अभियान जोरात राबवले. शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे तालुकाध्यक्ष गणेश जाधव शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर शिर्डी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे उप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे उपतालुका अध्यक्ष विकी बेंद्रे, सावळीविहीर शहर अध्यक्ष अभिषेक पोपळघट चेतन झिंजाड गौरव भालेराव निमगाव शहर अध्यक्ष ऋषी धीवर प्रसिद्धीप्रमुख साई कुमावत रवींद्र कुसळकर प्रवीण असणे, दत्ता अशोक खोसे, किरण पगारे, राहुल फुंदे यांनी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे अभियान मोठ्या उत्साहात राज साहेबांचे भाषण व सर्वत्र पक्षाचे झेंडे लावून सदस्य नोंदणीचे बोर्ड जागोजागी लावून संपन्न केला ह्या नोंदणी अभियानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब कदम यांनी भेट दिली आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना खूप महत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन केले हे अभियान तीन दिवस 11 तारखेपर्यंत शिर्डी येथे चालणार आहे तर पुणतांबा बाबळेश्वर सावळी विहीर राहता येथेही हे अभियान सुरू राहणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी दिली आहे




