ब्रेकिंग
पुणतांबा येथील दानशूर साई भक्त श्री विलासराव दुरगुडे यांनी ०२ लाख ९९ हजार ९९९ रुपये किमतीचे दान श्री साई चरणी अर्पण.

0
0
6
5
0
7
शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो साई भक्त शिर्डीला येत असतात. श्री साईबाबांवर भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक मोठ्या भक्ती भावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपात उदंड दान अर्पण करत असतात. याच श्रद्धेपोटी पुणतांबा येथील दानशूर साई भक्त श्री विलासराव दुरगुडे यांनी ०२ लाख ९९ हजार ९९९ रुपये किमतीचे अपोलो एड्युरंस कंपनीचे १६ नग टायर श्री साई संस्थांनकडे देणगी स्वरूपात सुपुर्द केले . या साई भक्तांचा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीतर्फे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
0
6
5
0
7




