पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखालीशिर्डीत भाजपच्या संघटनात्मक बैठकीला प्रचंड प्रतिसाद!

शिर्डी (प्रतिनिधी): पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली
अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
पक्ष संघटना अधिक सक्षम करत आगामी काळात तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्षाची विचारधारा, विकासाची भूमिका आणि जनहिताचे कार्य प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी व्यापक चर्चा केली.
बैठकीदरम्यान आगामी प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. संघटनात्मक विस्तार, बूथ सक्षमीकरण, कार्यकर्त्यांचे प्रभावी प्रशिक्षण, जनसंपर्क अभियान तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत पदाधिकाऱ्यांशी सखोल संवाद साधला. प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेची ताकद अधिक वृद्धिंगत करत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाच्या ध्येयधोरणांना अधिक बळ देण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम, निष्ठा आणि संघटनशक्तीवर उभा असलेला पक्ष आहे. संघटनाची मजबुती हीच पक्षाच्या यशाची खरी ओळख असून आगामी काळात अधिक जोमाने, अधिक संघटितपणे आणि जनसेवेच्या भावनेतून कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




