Breaking
ब्रेकिंग

सुभाष त्रिभुवन यांना “कर्तव्यदक्ष ,समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

0 0 6 5 0 7

श्रीरामपूर : शौकत भाई शेख/
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांना त्यांच्या सौभाग्यवती सुशीला त्रिभुवन यांच्या समावेत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे ‘कर्तव्यदक्ष समाजसेवक’ पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान मौलाना आझाद कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे मॅनेजर साहेबराव जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी माणिक जाधव, सुनील जाधव, अनिल जाधव आणि महेंद्र जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना साहेबराव जाधव यांनी सुभाष त्रिभुवन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुभाष त्रिभुवन यांनी सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेत सामाजातील उपेक्षित,वंचित आणी दुर्लक्षितांचे विविध ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
तसेच श्रीरामपूर येथील विस्थापित व्यापाऱ्यांचा प्रश्न असो किंवा श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठीची आंदोलने असोत, अन्यायाला वाचा फोडण्याचे आंदोलने असो अशा प्रत्येक वेळी कायम दक्ष राहून समस्त अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे मोठे समाजकार्य सुभाष त्रिभुवन यांनी पुढे येऊन समाजहिताचे कार्य केले आहे.
अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, असेही जाधव यांनी नमूद केले.
“सुभाष त्रिभुवन हे छत्रपती संभाजीनगर चे जावई असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या हातून पुढेही असेच सामाजिक कार्य घडत राहो,” अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्रीरामपूर शहर तालुक्यासह जिल्हाभरातील सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे