राहता शहरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात भक्तीमय आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

राहता (प्रतिनिधी): राहता शहरात सकाळपासूनच प्रमुख ईदगाह मैदान परिसरात मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बकरी ईद निमित्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदानात विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाज पूर्वी धर्मगुरूंनी ईद -उल-अजहाचे महत्व सांगत त्याग, समर्पण, मानवता आणि बंधू भावाचा संदेश दिला. नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशात सुख-समृद्धी शांतता आणि भाईचारा कायम रहावा यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यात आली. राहता शहरात सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदगाह परिसरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते त्यामुळे सण शांततेत आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी धर्मगुरु मौलाना याहया कासमी, राहता नगरपरिषद गटनेते हाजी मुन्नाभाई शहा पत्रकार राजू भाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते इलियास शहा, पत्रकार मुस्ताक शहा, पत्रकार जावेद सय्यद, मौलाना अल्ताफ, मौलाना रेहान, इलियासभाई शहा सर, मौलाना लतीफ, मौलाना कमरुद्दीन, मुफ्ती अब्दुल रहीम, हाफिज अकील, जमील शहा, हाफिज शकील, मौलाना मसूद, मौलाना अजीम, मौलाना अरबाज, हाफिज मुकीम, मौलाना शोएब, आतिक भाई शहा, मुनवर, इनामदार, जमील इनामदार, शाहिद शेख, शिराज भाई अजिज शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.




