लोणी येथे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ

लोणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत राज्यस्तरी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन लोणी येथे दिनांक ७ ते ९ फेब्रुवारी२०२६ या कालावधीत करण्यात आले आहे राज्यभरातील जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे आयोजन जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यां मध्ये क्रीडा वृत्ती शारीरिक तंदुरुस्ती संघ भावना व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याचे उद्देशाने करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध क्रीडा लोणी बुद्रुक येथे शानदार सुरुवात झाली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळात सहभाग नोंदवत खेळाडूंचा उत्साह दुगुणीत केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध क्रीडांगणावर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये पुरुष व महिलांसाठी क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ व जलतरण यासारख्या विविध खेळाचा समावेश करण्यात आला स्पर्धेच्या शुभारंभ दोन्ही मंत्र्यांनी केवळ औपचारिक हजेरी न लावता क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगची कौशल्य आजमावले तसेच बुद्धिबळाच्या पटावरही काही वेळ चालत बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवली यावेळी मंत्री श्री महाजन आणि मंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धा काशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते निरोगी आयुष्यासाठी खेळाची नितांत गरज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळून प्रशासनात शिस्त व आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर सचिव संजय बेलसरे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडू व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




