संयुक्त साई सेवा मंडळ भव्य पालखी पायी दिंडी सोहळा सांताक्रुज येथून मोठ्या आनंदात व उत्साहात साई नामाच्या गजरात शिर्डीत दाखल .

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या पावन भूमीमध्ये लाखो साई भक्त देश विदेशातून आपल्या वाहना द्वारे तसेच काही पायी दिंडी पालखी द्वारे येत असतात व साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन तृप्त होतात त्यातच सांताकुझ येथील संयुक्त साई सेवा मंडळ भव्य पालखी पायी दिंडी सोहळा पदयात्री सांताक्रुज ते शिर्डी सुमारे २५ वर्षापासून पायी दिंडी सोहळा शिर्डीत मोठ्या भक्ती भावाने येत असतात .ह्या संयुक्त साई सेवा मंडळाला सुमारे पंचवीस वर्षापासून श्री साईबाबांच्या शिर्डी पावनभूमीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीला नतमस्तक होऊन तृप्त होतात. या संयुक्त साई सेवा मंडळ भव्य पालखी पायी दिंडी सोहळा सांताक्रुज मंडळाचे अध्यक्ष मा. श्री जगदीश सिंगजी उपाध्यक्ष मा. श्री राजू गुरव जी सचिव मा. श्री दयानंद शिंदे, विनोद जी वाघमारे . पुरुष, महिला, मुले , मोठ्या संख्येने साईभक्त या पालखीत सहभागी होऊन संयुक्त साई सेवा मंडळ भव्य पालखी पायी दिंडी सोहळ्या च्या माध्यमातून श्री साईबाबांचे प्रचार व प्रसार गावोगावी करत असतात. शिर्डी नगरीत श्रद्धा भक्ती आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला ओम साई रामच्या अखंड जय घोषणात आणि भक्तीच्या सागरात निघालेल्या या पायी दिंडी सोहळ्यात मोठा आनंद उत्सव साजरा होतो साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले साईबाबांची श्रद्धा व सबुरी तसेच सबका मालिक एक हा साईचा संदेश या पालखी दिंडी सोहळ्या च्या माध्यमातून जगभरात पोहोचवला जातो.




