श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी डिझाईन .मा.ना. श्री रामदास आठवले व सभापती मा.ना. श्री राम शिंदे यांना पसंत…

शिङी /प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या डिझाईनला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी पसंती दर्शवली आहे.ते दोघे शिर्डी येथे दौऱ्यावर आले असताना श्रीरामपूर रेल्वे स्टेशनसमोरील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या नियोजित भव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामाचे डिझाईन त्यांना दाखविण्यात आले.
या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपाईचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची सविस्तर माहिती दिली. बाबासाहेबांच्या स्मारकाचे डिझाईन पाहून दोन्ही मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुभाष त्रिभुवन यांना विचारणा केली की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे का? कारण श्रीरामपूरच्या आमदारांनी या कामाला परवानगी मिळालेली नसल्याचे मला सांगितले होते”. यावर सुभाष त्रिभुवन यांनी स्पष्ट केले की, संबंधित आमदारांकडून मुद्दाम या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असून तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामास अधिकृत परवानगी मिळवून दिली आहे.तसेच जिल्हा नियोजन समितीकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामाची वर्क ऑर्डर देखील निघाली आहे.०१ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता बौद्ध धर्मगुरू भंते करुणानंद यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजनही पार पडले असून सध्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे.
स्मारक समितीच्या मते,श्रीरामपूर शहरातील नागरिकांचे आणि भीम अनुयायांचे अनेक वर्षांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे स्वप्न असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक लवकरच साकार होणार आहे. त्यामुळे भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे श्रीरामपूरच्या वैभवात भर पडणार आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी माहिती देताना सांगितले की, या स्मारकाच्या परवानगी प्रक्रियेसाठी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या प्रसंगी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,राज्याचे नेते राजाभाऊ कापसे,राज्य सचिव दीपक गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, नाना त्रिभुवन, आकाश शेजवळ अनिल रणवरे, पप्पू कोळगे, दीपक कदम,राकेश कापसे आदी उपस्थित होते.




