भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाचे वाचन वर्षावास प्रारंभ, जास्तीत जास्त धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे! जाहीर आव्हान राहता तालुका बौद्ध महासभा

शिर्डी (प्रतिनिधी)-विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन वर्षावास प्रारंभ आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा बुधवार दि. 29/7/2026 ते ऑक्टोबर 26/10/2026 पर्यंत या कालावधीत संपूर्ण भारतभर (अखंड जंम्बुदीप ) मध्ये वर्षावास ग्रंथ वाचन चालू होत असून आपण आपल्या गावातील बुद्ध विहार किंवा समाज मंदिर किंवा सामुदायिक ठिकाणी किंवा आपल्या घरी या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन सुरू करावे.यामुळे आपल्याला जीवन जगण्याची कला समजेल.आज जगाला युद्ध नको बुद्ध हवा. कारण आज आपल्या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून भविष्यासाठी दिल्ली मध्ये जंतर मंतर मैदान वर आंदोलन विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला अश्रुधूरांच्या निळकंठ्या फोडल्या, महाराष्ट्र राज्यामध्ये उप वर्गीकरण च्या नावाखाली दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. म्हणून जगाला युद्ध नको बुद्ध हवा. जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्म मानला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास करून जगाला शांतता करुणा मैत्रीचा संदेश देणारा बौद्ध धर्म निवडला बौद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला. अत्त! दीप!! भव!!! म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा! स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करा!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत अनंत उपकार असून त्यांच्या विचारांच अनुकरण करणे हे आपलं कर्तव्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा समाजाचा रथ इथपर्यंत आणला आहे. पुढे नेता आला तर न्या परंतु मागे नेऊ नका. म्हणून प्रत्येक बौद्ध धम्म बांधवांनी या वर्षावासाच्या निमित्ताने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचे वाचन आपल्या घरामध्ये सुरू करावे. ही नम्र विनंती. भारतीय बौद्ध महासभा राहाता तालुका अध्यक्ष. बौद्धाचार्य_ आयु. गौतम गोडगे. मो. 8975931608*



