Breaking
ब्रेकिंग

माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न

0 1 3 5 8 0

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेच्या येथील डी,डी काचोळे विद्यालयाचे असलेल्या विद्यार्थ्यांनी सीईटी परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. यापैकी रयत शिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. गोराणे सर यांचा मुलगा चि,सिद्धेश गोराणे या विद्यार्थ्यांने सी, मेन्स मध्ये ९९,९३ % गुण मिळवून ही एडव्हानस ऑल इंडिया रँक ३०४६ प्राप्त करून ११७ खरगपुर पं,बंगाल येथे निवड झाली आहे, तर नारायण व जयश्री सरदार यांचे चिरंजीव व चंद्रकांत सरदार तसेच मेजर कृष्णा सरदार यांचें नातु चि.स्वराज याने नुकत्याच झालेल्या सीईटी परिक्षेत कठोर परिश्रम घेऊन सातत्यपुर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर ९८.२६ % गुण हासिल केले आहेत.
या पहिल्याच स्पर्धात्मक परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस एक नवे दालन खूले झाले आहे त्यांचाही निश्चितच चांगल्या ठिकाणी नंबर लागेल अशी अपेक्षा आहे
तसेच खैरी निमगांव येथील प्रकाश मेघळे यांची कन्या डी डी काचोळे विद्यालयाची विद्यार्थिनी कु, विद्या हिने इयत्ता १० वी मध्ये ८५.७८ % गुण संपादन करून ग्रामीण भागातील खैरी निमगांव चे नाव रोशन केले असल्याने माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने घरी जाऊन या विद्यार्थ्यांंचा यथोचित सत्कार करून शाबासकीची थाप देण्याचा प्रयत्न समीतीने केला आहे. याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार,मेजर बाळासाहेब बनकर माजी सैनिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भागडे यांची कन्या कु , प्रतिक्षा यांनी आपल्या मनोगतात विशद केले की,

जसे या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे राज्याचे व शैक्षणिक संस्थेचे नांव उंचावले आहे तसे इतर विद्यार्थ्यांनी देखील या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार उत्तम दाभाडे, मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे अशोक कायगुडे,बाळासाहेब बनकर, संग्राम यादव , जनार्दन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शेजुळ, प्रकाश मेघळे,वनीता मेघळे, पालक,शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब भागडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे