Breaking
ब्रेकिंग

पेट्रोल पंपावरील लूट थांबवा……..! वाहनधारकांची मागणी

0 1 3 5 8 0

शिर्डी प्रतिनिधी…. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईनगरीत सध्या छोटे-मोठे व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली असताना अशातच शहरातील पेट्रोल पंप चालकांनी वाहनधारकास लुटण्याचे कारस्थान सुरू केले आहे नुकत्याच झालेल्या अमेरिका- इराण युद्ध परिस्थितीमुळे देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता त्याचा परिणाम म्हणून वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम झाला होता त्यातून वाहनधारक सावरतो न सावरतो तोच आता पेट्रोल पंप चालक रेग्युलर पेट्रोल ऐवजी महागाचे पावर पेट्रोल देऊन वाहनधारकांची अक्षरशः लूट करीत आहेत ..
पेट्रोल संपले आहे पावर पेट्रोल शिल्लक आहे असे भासवून चढ्या दराने १२१ व १२२ रुपये दराने पेट्रोल घेण्यास भाग पाडत आहेत शासनाने या गंभीर प्रश्नावर गांभीर्याने विचार करून वाहनधारकांना दिलासा द्यावा तसेच पंपावरील मशीनला लावलेली नळी (पाईप )हा पारदर्शक असावा अशी मागणी वाहनधारका कडून करण्यात येत आहे या नळीतून पेट्रोल भरताना नळीतील पेट्रोल दिसायला हवे याकरिता योग्य त्या उपाययोजना राबवून वाहनधारकांना न्याय द्यावा अशी मागणी वाहनधारकाकडून होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे