शिर्डीत गुन्हेगारीला आश्रय दिला जाणार नाही….

शिर्डी (प्रतिनिधी)/-साईनगरीत शिर्डी मधील साईभक्त सुरक्षा , स्वच्छता, आणि वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शिर्डी नगरपरिषद पोलिस प्रशासन व श्री साईबाबा संस्थानच्या यांच्या संयुक्त बैठकीत आता शिर्डीत गुन्हेगारीला आश्रय नाही अवैधरित्या व्यवसाय अतिक्रमण भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा केली आहे गेल्या काही दिवसांपासून अहिल्या नगर जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी वर डोकें काढलें मागील आठवड्यात श्रीरामपूर येथील हाॅटेल व्यावसायिकांची हत्या झाली त्यानंतर बंद पुकारला आक्रोश मोर्चा काढला त्यात सर्वपक्षीयांनी प्रतिनिधीसह नागरिकांनी सहभागी होऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकमत केले त्यानंतर पोलिस प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली त्यानंतर नव्याने शिर्डीत साईबाबांच्या दारात गेट क्रमांक चार समोर काकडी व्यवसाय करणाऱ्या महिलांवर चाकुने सपा सप वार करून हत्या करण्यात आली विशेष म्हणजे हि हत्या संबंधित दोन महिलांनी केली यावरून सिद्ध होते की गुन्हेगारी क्षेत्रातील विविध घडामोडींत महीला सहभागी आहेत भक्तांच्या वस्तू चोरीला मोठ्या प्रमाणात महिलांचा हात आहे हे सिद्ध झालेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिर्डीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात शांतता सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबविण्यात सामुहिक प्रयत्न होणार आहे पानटपरी आड अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे पानटपऱ्याना नगरपरिषद अधिकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे नियमांचे उल्लंघन केले तर कठोर कारवाई तसेच श्वानाचे दुध बंद होणार, हायटेक मशीन जप्ती साईबाबांच्या फोटो जास्त दरांत विक्रीचा पर्दाफाश केला,फुटपाथवर व हातगाडीवर बेकायदा व्यवसायांना बंदी घातली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून भाविकांची फसवणूक केली तर कारवाई होणार शहरांतील गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही शिर्डीतील सुरक्षा व भक्तांची हीच प्राथमिकता असणार



