ब्रेकिंग
दानशूर साई भक्तांकडून श्री साई चरणी सोन्याची श्री गणेश मूर्ती अर्पण
0
0
4
2
4
0
- श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणातून साई भक्त येत असतात अनेक साई भक्त साई चरणी सोन्याच्या देणगी देत असतात त्यातच गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका दानशूर साई भक्ताने श्री साईबाबांच्या चरणी 102. 450 ग्रॅम वजनाची सोन्याचीश्रीगणेश मूर्ती अर्पण केली ही मूर्ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असून त्याची अंदाजी किंमत 12 लाख 39 हजार 440 इतकी आहे. दानशूर साईभक्तांनी आपले नाव गुपित ठेवण्याचे श्री साई संस्थानला नम्र विनंती केली कोणत्याही प्रसिद्धीची मोह न ठेवता केवळ सेवा म्हणून श्री साई चरणी हे दान अर्पण करण्यात आलं अशा निस्वार्थी भक्ती मुळे साई भक्तांची श्री साईबाबा श्रद्धा अधिक दृढ होत चालली आहे सोन्याची गणेश मूर्ती साई चरणी अर्पण केल्यानंतर देणगीदार साई भक्तांचे श्री साईबाबा संस्थानचे उपकार कार्यकारी भीमराज दराडे यांनी दानशूर साईभक्तांचा सत्कार केला व आभार मानले
0
0
4
2
4
0




