Breaking
ब्रेकिंग

कोल्हापूर येथे दिनांक १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरी मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा संस्थेचे कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार.

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) कोल्हापुर येथे
दि. १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत
पार पडलेल्या राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली व चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या संघांमध्ये “सर्वांत शिस्तबद्ध संघ” हा मानाचा पुरस्कार (चषक व रु. ५,५५५/- रोख पारितोषिक) संस्थानच्या संघाला प्राप्त झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल  संस्थानचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कर्णधार श्री. सुदेश रामदास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघातील पुढील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली — गणेश रूपचंद जानराव, अतिक दिलदार पठाण, आकाश भानुदास नराडे, अनिल शंकर जगताप, संतोष बाबासाहेब गावडे, बाबासाहेब लहाणु दरके, चंद्रकांत दिलीप जपे, किरण भगवान मोरे, प्रमोद भानुदास बहे, सुदर्शन अशोक वेर्णेकर, दुश्यंत छत्रराव आहेर व श्याम माधव वायकर. अंबादास शेजवळ
संघाला मार्गदर्शन क्रीडाशिक्षक श्री. राजेंद्र कोहोकडे सर व डॉ. विक्रम सातपुते सर यांनी केले. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे साहेब व प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत संस्थानच्या सेवकांनी क्रीडा क्षेत्रातही आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून शिस्त, संघटन आणि संस्थानप्रती निष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे