Breaking
ब्रेकिंग

शिर्डीत राज्यस्तरीय १७ व्या सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेचे उदघाटन साई निर्माण समूहाचे प्रमुख मा. श्री विजय कोते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

0 0 4 2 4 0

शिर्डी ((प्रतिनिधी)राज्यस्तरीय १७ वी सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिर्डी येथे गोल्डन क्रिकेट ॲकॅडमी व के.पी. क्रिकेट अकॅडमी च्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन साई निर्माण समूहाचे प्रमुख श्री विजय कोते यांचे हस्ते झाले. यामुळे राज्यातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून . या स्पर्धा महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केल्या आहे. या स्पर्धेमधून राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन सचिव राजेंद्र इखणकर यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव तथा अहिल्यानगर जिल्हा सचिव श्री मकरंद कोऱ्हाळकर सर यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले .अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरुण चंद्रे यांनी राज्यातील सर्व संघांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहभागी झाल्याबद्दल कौतुक करून धन्यवाद दिले. साईबाबांच्या पावन भूमीत या स्पर्धा होत असून त्यामुळे या खेळाचे पुढील वाटचाल उज्वल आहे. सर्व खेळाडूंनी साईबाबांचा श्रद्धा व सबुरी हा मूलमंत्र आचरणात आणावा असे उद्घाटक साई निर्माण समूहाचे प्रमुख श्री विजय कोते यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहसचिव कल्पेश भागवत सर अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन तसेच रिझवान पठाण प्रा. सुनील कुटेसर, उमेश वाघोले कन्हैया गांगुले, अक्षय आव्हाड, आशिष मेहेत्रे, शमित माळी आणि परविन मुंगसे, सोमनाथ सपकाळ, युवराज माडकर, गणेश गायकवाड आदी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत एकूण वीस मुलांचे व अठरा मुलीचे संघ सहभागी झाले होते. या प्रसंगी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री इंद्रजीत नितीन वार, सोलापूरचे संतोष खेडे पंच कमिटीचे प्रमुख आनंदा कांबळे अजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे शिर्डी येथे क्रीडामय वातावरण निर्माण होणार असून बेसबॉल ह्या खेळाला राज्यात अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे