पेट्रोल पंपावरील लूट थांबवा……..! वाहनधारकांची मागणी

शिर्डी प्रतिनिधी…. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईनगरीत सध्या छोटे-मोठे व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली असताना अशातच शहरातील पेट्रोल पंप चालकांनी वाहन चालकांना व वाहन मालकांना लुटण्याचा प्रकार सर्रास घडत आहेत तसेच नुकत्याच झालेल्या अमेरिका- इराण युद्ध परिस्थितीमुळे देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता त्याचा परिणाम म्हणून वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम झाला होता त्यातून वाहनधारक सावरतो न सावरतो तोच आता पेट्रोल पंप चालक रेग्युलर पेट्रोल ऐवजी महागाचे पावर पेट्रोल देऊन वाहनधारकांची अक्षरशः लूट करीत आहेत ..
पेट्रोल संपले आहे पावर पेट्रोल शिल्लक आहे असे भासवून चढ्या दराने १२१व १२२ रुपये दराने पेट्रोल घेण्यास भाग पाडत आहेत शासनाने या गंभीर प्रश्नावर गांभीर्याने विचार करून वाहनधारकांना दिलासा द्यावा तसेच पेट्रोल पंपावरील मशीनला लावलेल्या पाईप हा पारदर्शक असावा अशी मागणी वाहन धारका कडून करण्यात येत आहे या पेट्रोल वाहक पाईप लाईन पारदर्शकता असल्याने इंधन वाहनात पुर्ण भरते यांची खात्री होते यामुळे वाद निर्माण होणार नाही अशा मनमानी कारभार करणाऱ्या पेट्रोल डिझेल पंप चालकांनी योग्य उपाययोजना करण्यात यावी आपल्या कर्तव्यात बदल करावा वाहनधारकांना समाधानकारक भावना निर्माण झाली पाहिजेन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे



