ब्रेकिंग
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्यावतीने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)–
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने व्दारावती भक्तनिवास समोरील बागेत आज जागतिक योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. योगाचार्य डॉ नचिकेत वर्पे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह संस्थान अधिकारी, कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्या योगासने केली.
0
1
3
5
8
0



