Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थानच्या सामाजिक आव्हानास साई भक्तांचा मोठा प्रतिसाद

0 0 4 2 4 0

शिर्डी :(प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या पावन भूमीमध्ये लाखो साई भक्त मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या दान साई चरणी अर्पण करत असतात त्यातच श्री साईबाबा
संस्थानच्या सामाजिक आव्हानास प्रतिसाद देत अनेक कुटुंबियांनी आपल्या परिवारातील सदस्याच्या दुःख निधनानंतर चक्क नेत्रदानाचे अमूल्य कार्य संस्थांनच्या नेत्रपेढी मध्ये केल आहे . या उदात्त निर्णयामुळे अंधत्वग्रस्त व दृष्टीअभावी त्रस्त असलेल्या अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयामध्ये यापूर्वीही नेत्र प्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या असून, त्या माध्यमातून अनेक रुग्णांना पुन्हा दृष्टी लाभली आहे. नेत्र पेढी, आधुनिक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य शास्त्रशुद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ मैथिली पितांबरे यांनी सांगितले की,
“नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ते दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अतिशय पवित्र कार्य आहे. संस्थानमध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून भविष्यातही पात्र रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ सौदामिनी निघुते यांनी सांगितले की,
“योग्य वेळेत मिळालेले नेत्रदान आणि वैद्यकीय निकषांनुसार केलेले प्रत्यारोपण यामुळे रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळू शकते. संस्थानकडे आवश्यक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व अनुभव उपलब्ध असून गरजू रुग्णांनी निःसंकोचपणे साईनाथ रुग्णालयाशी संपर्क साधावा.”
नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या गरजू रुग्णांनी संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात संपर्क साधून आवश्यक तपासणी करावी, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. पात्र रुग्णांना वैद्यकीय तपासणीनंतर नियमानुसार नेत्र प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
नेत्रदान व नेत्र प्रत्यारोपणाच्या माध्यमातून समाजात सेवाभाव, करुणा व मानवतेचे मूल्य अधिक दृढ करण्याचे कार्य श्री साईबाबा संस्थान अविरतपणे करत असून, नागरिकांनी या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे