Breaking
ब्रेकिंग

श्री साई बाबांच्या भक्तीचा आणि आदिमाये च्या शक्तीचा संगम शिर्डी ते वणी पदयात्रेला प्रारंभ

0 0 4 2 4 0

शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीतून आदिमाया शक्तिपीठ सप्तशृंगी गडाकडे श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी कर्मचारी वृंद तसेच साई संस्थांचे चेअरमन मा. विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते तसेच संस्थेचे संचालक संचालिका सचिव सहसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी ते सप्तशृंगी गड (वणी) या पायी पदयात्रा सोहळाचे हे 29 वी वर्षे असून आज रविवार दिनांक 11/01/2026 रोजी सकाळी सहा वाजता शिर्डी खंडोबा मंदिरा जवळ संस्थेचे चेअरमन मा. विठ्ठल पवार व संचालक मिलिंद दुनबळे संस्थेचे सचिव मा. विलास वाणी यांच्या हस्ते पालखी चे पूजा व आरती करून पदयात्रेला प्रारंभ झाला. गेल्या तीन दशकात अखंडितपणे सुरू असणारे ही पदयात्रा शिर्डीतील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रद्धा भावेची प्रतीक बनली आहे यंदाही मोठ्या उत्साहात भजनाचा गजर शिस्तबद्ध नियोजन भक्तिमय वातावरण अनुभवायला आला शिर्डी ते वणी हा प्रवास केवळ अंतर कापण्याचा नसून साई भक्ती व देवीचा शक्तीचा सांगड घालणारा आहे श्री साईबाबांच्याचरणी आशीर्वाद घेऊन शेकडो पदयात्री वणी च्या दिशेने मार्गस्थ झाले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे