ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीतर्फे तहसीलदार तालुका राहता यांना जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत तसेच सामान्य ग्राहकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष: मा. श्री. दादाभाऊ केदारे, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष: मा. श्री. भगवान थोरात, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुका नायक तहसीलदार मा. श्री. हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने आपले लक्ष केंद्रित करावे हा हेतू व उद्देश देशात व राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीच्या बाबत आपण विचार केला असता प्रचंड प्रमाणात महागाई होत आहे. शेतकरी बांधवासह सामान्य माणसाची फसवणूक होत आहे बाजारपेठेत कडधान्य, खाद्यतेल, तांदूळ, धान्य, गॅस सिलेंडर, भाजीपाला, बियाणे खते, कीटकनाशके याच्या किमती वाढल्या आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिक मजूर शेतकरी बांधव यांची कंबरडे मोडले आहे तसेच व्यापारी वर्गाचा साठेबाजी व काळाबाजार या कृत्याने जीवनावश्यक वस्तूच्या टंचाई निर्माण झाली आहे . हे एक दरवाढीचे कारण निर्माण झाल्याचे दिसून येते. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे व दररोज जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक हिताचे रक्षण व रास्त दारात वस्तू
मिळवून देणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) दरवाढीचे नियंत्रण: जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या किमतीवर शासनाने तात्काळ नियंत्रण ठेवणे आणि साठेबाजी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
२) रेशन दुकान द्वारे पुरवठा: शिधापत्रिका धारकांना (रेशन दुकानावर) चांगल्या दर्जाचे गहू तांदूळ तसेच सर्व प्रकारचे डाळी खाद्यतेल आणि साखर अत्यंत सवलतीच्या दरात पुरवण्यात यावी तसेच रेशन दुकान उघडण्याच्या वेळेचे फलक लावण्यात यावे.
३) बाजारपेठेची तपासणी: स्थानिक प्रशासनाने बाजारपेठेत तपासणी करून वस्तूची साठेबाजी आणि छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या वर कायदेशीर कडक कारवाई करावी.
४) गॅस सिलेंडरचे दर कमी करा: घरगुती गॅस सिलेंडरची दर सामान्य जनतेच्या अवक्यात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
सर्वसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती जर यावर लवकरात लवकर योग्य पावले उचलले गेले नाहीत तर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
राहता तालुका तहसीलदार कार्यालयात मा.श्री. हेमंत पाटील नायक तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अँड -श्री रामनात सदाफळ पत्रकार श्री. रवींद्र जगताप पत्रकार श्री मुस्ताक अली भाई शहा श्री दिनकर साळवे असे विविध प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




