Breaking
ब्रेकिंग

सावळीविहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी

0 0 4 2 4 0

सावळी विहीर( प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यंदाही राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथील सावळी विहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली चिमुकल्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन महाराजांच्या नावाने जयघोष केला लेझीम पथक वेशभूषा केलेले मुल मुली पारंपरिक वेशभूषेतील मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच वेशभूषा केली होती या प्रेरणादायी महोत्सवाचे साक्षी होण्याची संधी उपस्थितांना मिळाली आहे
यावेळी शाळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल मुख्याध्यापक संदिप घोलप सर यांनी मुलांना माहिती सांगितली मुलांनी भाषणेही केली भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले मी शिव कन्या या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले सर्वानी सामुदायिक अल्पोपहार घेतला यावेळी मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी सावळीविहीर खुर्द पोलिस पाटील राजेंद्र जमधडे, साईनाथ झिंजाड, विजय खरात, महेंद्र मुसळे, सुनिल सुरळे, गणेश जावळे, योगेश देसले,गुंजाळ,शेलार देवकर , चव्हाण ,धसाळ,भदे,माळी, गांगुर्डे,मोठ्या संख्येने पालक ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र जाधव सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे