Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. यांची पुण्यतिथी शिर्डी नगरपरिषद मध्ये साजरी

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे जनक, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी २७ एप्रिल 2026 रोजी शिर्डी नगरपरिषद येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले..!
सहकार क्रांतीचे अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला सशक्त करायचं, या विचारातून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. हा साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. ‘सहकारतून समृद्धी’ या मार्गावर प्रथम शेतकऱ्यांची समृद्धी हे त्यांचे चरित्र आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. असे मत शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. #जयश्रीताई विष्णु थोरात यांनी यावेळी व्यक्त केले..!
यावेळी उपनगराध्यक्ष श्री अभय भैय्या शेळके पाटील बांधकाम सभापती श्री अरविंद कोते, आरोग्य सभापती श्री दीपक गोंदकर, नगरसेवक श्री निलेश दादा कोते, श्री सतीश गोंदकर, श्री बापूसाहेब ठाकरे, श्री नितीन कोते, श्री अमित शेळके, श्री किरण कोते, श्री वसंत गोंदकर, श्री किरण बोराडे, श्री सुधीर शिंदे, श्री गणेश सोनवणे, श्री वाल्मिक मामा गोतीस व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे