Breaking
ब्रेकिंग

अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशन टीमवर्क व ऑपरेशन मुस्कान चे कौतुक.

0 0 4 2 4 0

 

राहुरी / प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्याच्या इन्स्पेक्शनवेळी कृष्ण प्रकाश – अपर पोलीस महासंचालक , फ़ोर्स वन आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राहुरी पोलीस स्टेशन चे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करत मुदतीत मा. न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्याबाबत संपूर्ण राहुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार यांचे कौतुक करत अपर पोलीस महासंचालक कृण्ण प्रकाश यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच पोलीस स्टेशन बेलवंडी येथे कार्यरत असताना बेलवंडी परिसरात वेगवेगळे राज्यातील विविध रेल्वे स्टेशन वरून किडनॅप करून आणलेल्या व वेठबिगारीत बंदिस्त जीवन कंठणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या २३ वेठबिगारांच्या मुक्ततेबाबतही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन टीमचे कौतुक करत प्रशस्ती पत्र दिले.
राहुरी पोलिसांच्या या उतुंग कामगीरीमुळे संपूर्ण पोलीस खात्याची शान वाढली आहे, विविध क्षेत्रातून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे