Breaking
ब्रेकिंग

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटावर प्रतिबंधात्मक कारवाई

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो साई भक्त देश विदेशातून दररोज शिर्डी येथे येत असतात . मात्र मंदिर परिसर व शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तीकडून साई भक्तांची वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक होत असते. त्यामुळे शिर्डी सारखे पवित्र देवस्थान बदनाम होत आहे. ते थांबवण्यासाठी भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश उपविभागी दंडधिकाऱ्यांनी जारी केले. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातून पूजा साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खाजगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटावर आता भारतीय नागरिक सुरक्षा सहितेच्या कलम १५२ आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार श्री गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते चौक बस थांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आले आहे तसेच कोणत्या गावातून शिर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनानी विशिष्ट दुकान अथवा अस्थापल्यानेतून च खरेदी करावी किंवा निवास करावा असं आग्रह आता धरता येणार नाही कोणत्या व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. भोजन निवास किंवा दर्शनाचे नावाखाली मध्यस्थी चे व्यवहार करणाऱ्या वरही निर्बंध लादण्यात आले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय नागरिक सुरक्षा सहितेच्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्या व्यक्तीला दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपली बाजू मांडता येईल असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे