Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थान व ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन यांचे वतीने मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिर

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन श्री साईनाथ रुग्णालय (२००) रूम येथे शनिवार दिनांक-१४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये मोठ्या आकाराच्या किडनी स्टोनने ग्रस्त असलेल्या रुग्णावरती लॅप्रोस्कोपी द्वारे व छोट्या आकाराच्या किडनी स्टोनने ग्रस्त असलेल्या रुग्णावरती साऊंड वेव्ह च्या साह्याने लिथो टेप्सी शस्त्रक्रिया व्हॅनमध्ये मोफत करण्यात येणार आहे . शिबिरा करता पूर्व तपासणी चालू असून रुग्णांनी श्री साईनाथ रुग्णालयातील (२००) रूम येथील जनरल सर्जरी विभागाशी संपर्क साधावा पूर्व तपासणी केलेल्या रुग्णांचाच शस्त्रक्रिया शिबिरामध्ये केल्या जाणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी पूर्व तपासणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे शिबिरा करिता पूर्व तपासणीसाठी येताना रुग्णांनी आपले आधार कार्ड. राशन कार्ड. आयुष्मान कार्ड जुने रिपोर्ट्स व पासपोर्ट साईज दोन फोटो सोबत आणावे अधिक माहितीसाठी श्री साईनाथ रुग्णालय (२००) रूम शिर्डी येथे ०२४२३ २५८५३९.२५८५५५ या फोन नंबर वर संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे