Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थान रुग्णालय मोफत उपचार श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी तील कर्मचाऱ्यांना मिळावेत.

0 0 6 5 0 7

शिर्डी/-शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे या ठिकाणी देश विदेशातील भाविक भक्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येतात श्री साई संस्थानचे कर्मचारी ज्या प्रमाणे साई भक्ताची सेवा तसेच नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात त्या प्रमाणात संस्थान आवारात साई बाबांच्या भक्तांची सेवा सुलभ व्हावी यासाठी एम्प्लॉइज सोसायटी मार्फत मोबाईल-कॅमेरा,क्लोकरुम, चपल स्टँड प्रसाद स्टॉल आणि विविध स्टाॅल्स आहेत या ठिकाणी कर्मचारी रात्रंदिवस सेवा व कर्तव्य इमानेइतबारे बजावत आहेत श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटी कर्मचारी हे तुटपुंज्या पगारात आपली उपजीविका करतात मात्र या कर्मचाऱ्यांना व कौटुंबिक वैद्यकीय सुरक्षा कवच नाही हक्काची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आजारपणाच्या संकटात या कर्मचारी वर्गाची आर्थिक स्थिती कमकुवत दिसून येते खाजगी रुग्णालयात उपचार घेणे म्हणजे प्रथम कर्ज काढून उपचार करणे या सर्व बाबींचा विचार करून क्रेडिट सोसायटीचे चेअरमन मा.श्री . विठ्ठलराव पवार यांनी श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे साईनाथ व साईबाबा रुग्णालयात मोफत उपचार सोसायटी कर्मचाऱ्यांना मिळावेत अशी भावनिक मागणी केली आहे सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकार श्री गोरक्ष गाडीलकर यांना नुकतेच पत्र दिले आहे यावेळी संचालक रामा गागरे ,सचिव विलास वाणी, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे