ब्रेकिंग
श्री साईबाबांच्या चरणी 700 ग्रॅम नक्षीकाम केलेले सुवर्ण मुकुट अर्पण

0
0
4
2
4
0
- श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. आज अमेरिका येथील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.
हा मुकुट श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर मुकुटाची किंमत सुमारे १ कोटी ०१ लाख ३८ हजार शंभर रुपये आहे.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी दानशूर साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.
0
0
4
2
4
0




