जि.प. प्रा. शाळेत शालेय वस्तूचे वितरण….

शिर्डी/-राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथील सावळी विहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच शाळा पुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे सी.ए.फर्म पुणे व वसंत दादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चिमुकल्या मुलांना वह्या पेन रंगपेटी विविध शालेय वस्तूंचे वितरण केले तसेच नारायण सुरळे यांनी मुलांना पाण्याच्या बाटलीचे वाटप केले तसेच राहुल सुरळे यांनी मुलांना अल्पोपहार दिला यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वसंत दादा फाऊंडेशनचे मिथुन चव्हाण म्हणाले की मी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कटीबध्द आहे मुख्याध्यापक संदिप घोलप यांनी मुलांना व पालकांना जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली अंगणवाडी सेविका नजराणा शेख ताई यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांची यशोगाथा सांगितली तसेच यावेळी उपस्थित निताताई कुंडल, अनमोल कुंडल, मिथुन चव्हाण, अनंत सुरळे ,साईनाथ झिंजाड, विजय खरात, वसंत मुसळे,कल्पनाताई सुरळे, बाबा चव्हाण, बाळासाहेब खरात, रोहित जावळे, निलेश सुरळे, शिंदे,वर्पे,माळी,सोनवणे,मोरे, अलकाताई सुरळे,देवकरताई, मोठ्या संख्येने पालक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम शिक्षक राजेंद्र जाधव यांनी घेतले



