अवधूत दादा गुरु भगवान यांचा आज शिर्डीत भव्य व दिव्य असा सत्संग सोहळा..

शिर्डी: (प्रतिनिधी)मध्यप्रदेशातील संत समर्थ अवधूत दादा गुरु भगवान यांचा उद्या शनिवार दि.११ एप्रिल रोजी शिर्डीत भव्य सत्संग आयोजित करण्यात आला आहे. महानयोगी अवधूत गुरु दादासाई फाऊंडेशनचे सेवक श्री मनोजभाऊ वाघ यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली.
शनिवारी सकाळी ७ वाजता श्री साईबाबांचे दर्शन घेतील. तदनंतर
दादा गुरु यांच्या शोभायात्रेचे सकाळी ८ वाजता आयोजन गेट क्रमांक ४ पासून करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता शिर्डीतील साई चरित्र पारायण हॉल ( साई आश्रम रूम ) येथे भाविकांसाठी भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत समर्थ दादा गुरु महाराज हे सिद्धपुरुष मानले जातात. ते सुमारे ५ वर्षांपासून अन्न ग्रहण न करता केवळ नर्मदा जल प्राशन करून राहत आहेत. त्यांनी आतापर्यंत ४ लाख किलोमीटरहून अधिक पायी प्रवास केला आहे. नर्मदा नदीचे संरक्षण आणि आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. ८ एप्रिल रोजी त्यांच्या निराहार व्रताला २ हजार दिवस पूर्ण झाले. याच पावन पर्वावर ते शिर्डीत येत आहेत. या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन दादा गुरु भक्त परिवार व संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.




