Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबांच्या चरणी १९३.७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत हार अर्पण.

0 0 6 5 0 7

शिर्डी : (प्रतिनिधी)
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान अर्पण करीत असतात.
याच श्रद्धेपोटी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त श्री. के. एस. एस. भगवान यांनी श्री साईबाबांच्या चरणी १९३.७०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत हार अर्पण केला. या हाराची किंमत २३ लाख ५९ हजार ६५३ रुपये आहे.
या प्रसंगी जिल्हा व प्रधान न्यायाधीश तथा श्री साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्री. के. एस. एस. भगवान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे