Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी झाली सज्ज. आता प्रतीक्षा साई भक्तांची.

0 0 4 2 4 0

 

शिरडी: श्री साईबाबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आणि भक्तीचा महासागर लोटणाऱ्या ‘शिरडी परिक्रमा महोत्सवा’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशन, श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिरडी नगर परिषद शिर्डी पोलीस स्टेशन आणि समस्त शिरडी ग्रामस्थ सज्ज झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही सक्रिय झाली आहे. यंदा परिक्रमेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शिर्डीकरांनी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

सांस्कृतिक मेजवानी आणि भव्य शोभायात्रा: यंदाच्या परिक्रमेचे मुख्य आकर्षण ‘रतलाम’ (मध्य प्रदेश) येथील भव्य शोभायात्रा असणार आहे. यामध्ये श्री साईबाबांचा सुवर्ण रथ, छत्र, चामर, ध्वज आणि पवित्र चादर सहभागी होणार आहे. याशिवाय:

कलाविष्कार: इंदूर येथील तांडव नृत्य पथक, केरळमधील पारंपरिक वाद्य पथक आणि डमरू पथक परिक्रमेची शोभा वाढवणार आहेत.

स्थानिक सहभाग: शिरडी परिसरातील विद्यार्थ्यांची लेझीम आणि पावली पथके, संबळ पथक, विविध चित्ररथ आणि भजनी मंडळी या भक्ती सोहळ्यात रंगत आणणार आहेत.

भक्तांच्या स्वागतासाठी सजली नगरी: संपूर्ण परिक्रमा मार्ग फुलांनी सजवण्यात येणार असून, मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिर्डीकर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून साईभक्तांचे स्वागत करणार आहेत.

एकादशीनिमित्त फराळाची विशेष सोय: परिक्रमेच्या दिवशी एकादशी (उपवास) असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मार्गावर १०० हून अधिक ठिकाणी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांतर्फे साबुदाणा खिचडी, फळे, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षा आणि सुविधांवर विशेष भर: गर्दीच्या नियोजनासाठी ग्रीन एन क्लीन फाउंडेशन आणि पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे त्याचबरोबर 500 स्वयंसेवक देखील नियुक्त करण्यात आलेले आहे

हायटेक सुरक्षा: गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले असून, ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आकाशातूनही नजर ठेवली जाणार आहे.

आरोग्य सेवा: परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरते शौचालय, प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका (Ambulance) तैनात असतील.

समारोप आणि प्रसाद: परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने भाविकांना प्रसादाचे आणि उदीचे वाटप केले जाईल. परिक्रमेचा मुख्य समारोप सोहळा ‘शताब्दी मंडपात’ पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर माननीय श्री सुजय विखे पाटील, सरला बेटाचे मठाधिपती रामगिरीजी महंत काशीकानंदजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या परिक्रमा सोहळ्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी, शिर्डी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. साईभक्तांनी या शिस्तबद्ध आणि भक्तीमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनचे संयोजक, पदाधिकारी आणि शिरडी ग्रामस्थांनी केले आहे.

संपर्क: श्री. अजित पारख (अध्यक्ष)
ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन
+ 91 9423787043

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे