जनसेवा फाउंडेशन व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मा . सौ. धनश्री ताई सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपरिषदेच्या २९ महिला बचत गटाला उद्योग व्यवसायासाठी शिर्डी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते साहित्याची वाटप

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी शहरातील कष्टकरी होतकरू व आपल्या कुटुंबाला आपला छोटा आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या शिर्डी नगरपरिषदेच्या २९ महिला बचत गटांना राहता तालुक्याचे भाग्यविधाते, राज्याचे जलसंपदा तसेच
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.खा. डॉ. सुजय दादा विखे पा. तसेच जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पा.व रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. धनश्री सुजय विखे पा. तसेच जनसेवा फाउंडेशन यांच्याकडून शिर्डीतील प्रति महिला बचत गटाला एक पिठाची गिरणी व एक वजन काटा भेट म्हणून देण्यात आला आहे यावेळी सदरचे साहित्य शिर्डी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. सौ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उपस्थित महिलांना वितरित करण्यात आला .या गिरणी व वजन काट्या चा वापर करून महिलांनी छोटासा गृह उद्योग सुरू करावा व स्वयंरोजगार निर्माण करून आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी अशी आग्रही भूमिका नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात यांनी यावेळी बोलताना मांडली सदरचे साहित्य महिलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. सुजय दादा विखे पा. यांचे .मा. नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यावेळी आभार मानले.यासाठी शिर्डी न. प. चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. विक्रम जोशी सर. समूह संघटक मा. संजया उदमले मॅडम, शिर्डी शहर स्तर संघ व्यवस्थापक कविता थोरात यांची मदत झाली.




