कुशल नेतृत्व युवा नेते मा .खा. श्री सुजय दादा विखे पा. यांच्या हस्ते तब्बल एक कोटी ३० लाख धनादेश वाटप

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट .को. ऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी व बँक ऑफ बडोदा शाखा शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा संस्थान कर्मचारी अपघात ग्रस्त विमा कवच योजना अंतर्गत एक कोटी धनादेश श्री साईबाबा संस्थांनचे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तसेच श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट. को.आप सोसायटी शिर्डीच्या वतीने संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांना नैसर्गिक अपघाती मृत्यू विमा योजनेअंतर्गत तीस लाख धनादेश श्री साई संस्थान सोसायटीच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक क्षण तब्बल एक कोटी तीस लाखाचा अपघाती विमा धनादेश कुशल नेतृत्व असणारे मा. खा. सुजय दादा विखे पा. यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आला .
मा . श्री सुजय दादा विखे पा . यांनी आपल्या भाषणात संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन श्री पोपटराव कोते तसेच सर्व संचालक संचलिका यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले तसेच संस्थेचे सभासद व संस्थेचे कर्मचारी यांच्या हिताचे निर्णय घेऊन संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक प्रमाणिकपणे संस्थेचे काम करत असतात विठ्ठल पवारांच्या नेतृत्वातील सोसायटीच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आणि कायम राहणार असे म्हणाले
त्याप्रसंगी शिर्डी व राहता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या प्रसंगी अनेक सभासद व कर्मचारी वृंद ग्रामस्थ उपस्थित होते.




