Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबांच्या दुबई व मुंबई साईभक्तांकडून दोन सुवर्ण स्वस्तिक अर्पण

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांच्या चरणी देश-विदेशातील साईभक्तांकडून विविध स्वरूपात श्रद्धापूर्वक देणगी अर्पण करण्यात येत असते. याच श्रद्धाभावातून दुबई येथील एका साईभक्ताने ८२ ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्ण स्वस्तिक श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले. तसेच, मुंबई येथील एका साईभक्ताने ८० ग्रॅम वजनाचे सुंदर नक्षीकाम केलेले आणखी एक सुवर्ण स्वस्तिक अर्पण केले.
या दोन्ही सुवर्ण स्वस्तिकांची एकत्रित किंमत रुपये २० लाख ६१ हजार ६१२ इतकी आहे. ही दोन्ही सुवर्ण स्वस्तिके श्री साईबाबांच्या मूर्तीशेजारील मागील भिंतीवर बसविण्यात आली आहेत. देणगीदार साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
या सुवर्ण स्वस्तिकांची देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे