Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा शैक्षणिक संकुलात ८ वी राष्ट्रीय केटलबेल चॅम्पियनशिप उद्यापासून सुरू

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी): श्री साईबाबांच्या पावन नगरी शिर्डी येथे ८ वी राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन दि. ४ ते ७ जून २०२६ या कालावधीत करण्यात आले असून, या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या दि. ४ जून रोजी श्री साईबाबा शैक्षणिक संकुलात संपन्न होणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहकार्याने तसेच केटलबेल स्पोर्ट लिफ्टिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व केटलबेल स्पोर्ट इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देशातील विविध राज्यांमधून सब-ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर तसेच व्हेटरन गटातील सुमारे १७० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांतील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आपल्या ताकदीचे, कौशल्याचे आणि क्रीडाभावनेचे प्रदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासही हातभार लावणार आहे.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था हे शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीलाही सातत्याने प्रोत्साहन देत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करीत असते. या राष्ट्रीय स्पर्धेमुळे देशभरातील खेळाडूंना शिर्डीच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाची ओळख होण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, सहभागी खेळाडू, प्रशिक्षक व मान्यवरांच्या स्वागतासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे