ब्रेकिंग
नगर मनमाड रस्ता त्वरित पूर्वत करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
0
4
2
4
0
नगर मनमाड रस्ता त्वरित पूर्ववत करा…… नामदार विखे पाटील
- शिर्डी…(प्रतिनिधी)….. अहिल्यानगर मनमाड हा बहुचर्चित असलेल्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचे काम चालू असल्यामुळे मोठ-मोठे खड्डे खोदण्यात आले असून या खड्ड्यांची माती रस्त्यावर टाकण्यात आलेले असल्यामुळे मोठ मोठे गंज तयार झाले आहेत त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे या महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले जाणार असल्याची शक्यता असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित ठेकेदारास अहिल्यानगर मनमाड रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
0
0
4
2
4
0




