Breaking
ब्रेकिंग

कर्जत येथे जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी तसेच इमारतीसाठी निधी मंजुर करणार: जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पा.

0 1 3 5 8 0

कर्जत दि.५ प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्राच्या सहकार्याने कर्जत येथील जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी मिळाली आहे.सर्वानी केलेला पाठपुरावा आणि वकील संघाने केलेल्या संघर्षाचे यश असून,न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी कर्जत येथील न्यायालयात वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांची सदिच्छा भेट घेतली.राज्य सरकारने कर्जत येथे जिल्हा सत्र न्यायालयास मंजूरी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष संग्राम ढेरे उपाध्यक्ष डी.जे.चव्हाण,सेक्रेटरी अविनाश मते,बाळासाहेब शिंदे शिवाजी अनुभूले यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,विधी व न्याय खात्याचा मंत्री झालो तेव्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागणीसाठी वकील संघाने आंदोलन केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधी व न्याय विभाग असल्याने त्यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्राचे आभार मानले.सभापती राम शिंदे यांच्यासह सर्वाचाच पाठपुरावा या मागणीसाठी होता.

वकील संघाने केलेल्या मागणीप्रमाणे न्यायालय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून वकीलांच्या कक्षाकरीता कृषी विभागाची जागा मिळावी तुमचा प्रस्ताव पाठवा कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.@all

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे