Breaking
ब्रेकिंग

जलसंपदा विभाग व राज्याची जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी निमित्त गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जल यात्रा आगमन “पीत्यर्थ”या निमित्ताने भव्य व दिव्य असं लोककला महोत्सव.

0 1 4 8 7 1

शिर्डी (प्रतिनिधी)राजमाता_पुण्यश्लोक अहिल्यादेवी_होळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त जलसंपदा विभाग व राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री राधाकृष्णजी_विखे_पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. खा. डॉ. सुजयदादा_विखे_पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “गोदा ते नर्मदा – अहिल्यादेवी जल यात्रा आगमन प्रीत्यर्थ” या निमित्ताने भव्य लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध The_Folk_आख्यान यांच्या सुरेल सादरीकरणातून लोकसंगीत, परंपरा आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवण्याची ही सुवर्णसंधी असून, सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई_विखे_पाटील व मा. सौ. धनश्रीताई_विखे_पाटील उपस्थित राहणार आहे..
तसेच शिर्डीकरांनी या लोककला, संगीत रजनीचा आनंद घ्यावा असे आवाहन शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा. सौ. जयश्रीताई विष्णु थोरात यांनी केले आहे..
हा कार्यक्रम रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता, श्री साईबाबा क्रिकेट मैदान, शिर्डी येथे सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे