शिर्डी नगरपरिषदेत विविध विषय समित्याच्या सभापतीची बिनविरोध निवड

शिर्डी-(प्रतिनिधी)-श्री साईबाबांच्या पावन झालेल्या शिर्डीमध्ये राहता तालुक्याचे भाग्यविधाते पालकमंत्री मा. श्री- राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सुजय दादा विखे पा. यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिर्डी नगरपरिषदेवर आपले वर्चस्व कायम ठेवून
महायुतीची सत्ता स्थापित केली त्या अनुषंगाने शिर्डी नगरपरिषदेच्या विविध समित्याच्या सभापती पदाच्या निवडणुका अत्यंत मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला या विशेष सभेत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आल्याने सर्व नगरसेवकांमध्ये एकीचे दर्शन घडले त्यामुळे शिर्डी शहरात आनंदाचे वातावरण दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिकारी माणिकराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी पक्षभेद विसरून विकासाच्या मुद्द्यावर भर देत सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडीला पसंती दिली. नियोजन समिती सभापती उपनगराध्यक्ष – अभय भैय्या शेळके. सार्वजनिक बांधकाम सभापती -अरविंद सुखदेव कोते. स्वच्छता व आरोग्य सभापती-दिपक रमेश गोंदकर. महिला व बालकल्याण समिती सभापती-सौ. सुनिता वसंत गोंदकर. पाणीपुरवठा सभापती-सौ. कोमल किरण बोराडे. वरील प्रमाणे सभापती निवड करण्यात आली त्यानंतर नगराध्यक्ष सौ -जयश्री ताई थोरात यांच्या हस्ते महिला सभापतीचा तर अधिकारी माणिकराव आहेर यांच्या हस्ते पुरुष सभापतीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे शिडी शहराच्या विकासाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून शिर्डीतील जनतेने सर्व सभापती व नगरसेवक यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या




