सावळविहीर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ नागरीक भयभीत. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

सावळीविहीर प्रतिनिधी/- अहील्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून कोपरगाव तालुका व राहाता तालुक्यातील सावळी विहीर तेथे बिबट्याचा मुक्त संचार अनेक नागरिकांवर
हल्ला केला आहे पशुधन यांसह पाळीव प्राणी ही असुरक्षित आहे राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथील पत्रकार विजय खरात यांच्या वस्तीवर सी सी कॅमेरा मध्ये कैद बिबट्याचा चित्तथरारक हल्ला लॅब्रा डॉग जातींचा कुत्र्यावरती हल्ला चढवला या हल्लात एक कुत्रा व कुत्री बिबट्याने फस्त केली आहे या बिबट्यांची संख्या दोन आहे या दोन्ही बिबट्याचा मुक्त संचार रस्त्यावर दिसुन येतो काही परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी सुरू आहे बऱ्याच ठिकाणी मका कापणी चालु आहे यामुळे बिबट्याना आडोसा नसल्याने बिबट्याने सावळी विहीर परिसरात तळ ठोकला आहे परिणामी असे की ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात मका, ऊस, गीनीगवत , आहे या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे विशेष म्हणजे शिर्डी सिन्नर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते प्रकाशमान वाहनाचा वावर तसेच गुजरात, मुंबई, नाशिक लगतच्या परिसरातील साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे येतात रस्त्यालगत या घटनेनंतर साईभक्तासह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे शेतीसाठी पाणी देण्याची वेळ असताना वीजपुरवठा खंडित होतो वीजेचा लपंडाव त्यात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त व भयभीत झाले आहे या घटनेनंतर तरी वनविभागाने उपाययोजना करावी साईभक्त किंवा शेतकरी बांधवांवरती बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाण्याची वाट पाहु नये लवकरात लवकर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात तेथील नागरिक करत आहे.




