शिर्डीत मा.ना पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पा.याच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा……

शिर्डी (प्रतिनिधी) मा.ना. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पा. यांना आरोग्यमय व उदंड आयुष्य लाभो यासाठी शिर्डीमध्ये शिर्डी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या संकल्पनेतून बौद्ध विहार भीम नगर येथे मा.ना. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हुबेहूब रांगोळीत छायाचित्र काढण्यात आले. ते वाढदिवसाचे मोठे आकर्षण ठरले. तसेच सौ. धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते अनेक प्रभाग मध्ये अंगणवाडी चे उद्घाटन व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन तसेच ठिकठिकाणी वृक्षरोपण सौ धनश्रीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नगरसेवक सचिन गायकवाड व मित्र परिवारातर्फे.रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच नगरसेवक अरविंद आप्पा कोते, नगरसेविका सौ. प्रतीक्षा किरण कोते. नगरसेविका सौ. छायाताई सुधीर शिंदे यांच्यामार्फत मोफत १ लाख अपघाती विमा उतरवण्यात आला. तसेच साहेबांना आरोग्यमय व उदंड आयुष्य लाभो यासाठी स्वामी समर्थ केंद्र शिर्डी येथे दुर्गा सप्तशती पठण करण्यात आले. तसेच नगरसेवक अमित दादा शेळके नगरसेविका सौ. सरिता गणेश सोनवणे,सौ. छायाताई सुधीर शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड, वय वंदना (अभा) कार्ड मोफत काढण्यात आले. तसेच नगरसेवक दीपक गोंदकर व नगरसेविका सौ. अलकाताई गोतीस यांच्यातर्फे अंगणवाडीतील लहान मुलांना शालेय बॅग व खाऊवाटप करण्यात आला. तसेच नगरसेवक नितीन दादा कोते. यांच्यातर्फे मारुती मंदिरासमोर महायज्ञ करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष श्री अभय भैया शेळके नगर परिषद मुख्य कार्य अधिकारी श्री सतीश दिघे नगरसेवक श्री अरविंद आप्पा कोते, श्रीअमित दादा शेळके, नगरसेविका सौ. प्रतीक्षा किरण कोते, सौ सरिता गणेश सोनवणे, सौ. छायाताई सुधीर शिंदे,सौ. अलकाताई गोतीस नगरसेवक श्री बापू ठाकरे, श्री नितीन पाराजी कोते, नगरसेवक दीपक गोंदकर, श्री नंदू गोंदकर, नगरसेवक श्री धनंजय कोते, श्री रमेश गोंदकर श्री गोपीनाथ गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते. सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ गोंदकर असे अनेक नगरसेवक व नगरसेविका व मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक स्तरातून आरोग्यमय व दीर्घ आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आल्या व पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




