Breaking
ब्रेकिंग

मा.ना. पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीच्या विकासाची भरारी: नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी) :
शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही शहरातील विकासकामांना मोठी गती मिळाल्याचे प्रतिपादन शिर्डी नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी शहरामध्ये विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये अंगणवाड्यांची उभारणी करण्यात आली असून, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जात आहेत. तसेच मा. खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध योजनांना गती मिळत आहे.
शिर्डी शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, पथदिवे तसेच नागरी सुविधांशी संबंधित अनेक प्रश्नांना प्राधान्याने हाताळण्यात आले असून, त्यावर प्रभावीपणे तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डीमध्ये आवश्यक पायाभूत नगर मनमाड रोडच्या कामाला गती अशा अनेक सुविधांची उभारणी, शहर सुशोभीकरण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध कामे सुरू असल्याचेही नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी नमूद केले.
शेवटी, “शिर्डीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो, ही साई चरणी प्रार्थना,” अशा भावना नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी व्यक्त केल्या.

5/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे