Breaking
ब्रेकिंग

आनंद बुद्ध विहार शिर्डी येथे बाल संस्कार दिवस व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा, शिर्डी शहर आयोजित
आयु-भगवान थोरात यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी तसेच राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तसेच आयु-प्रवीण आल्हाट मानवाधिकार आयोग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार भारतीय बौद्ध महासभा शिर्डी शहरातर्फे आनंद बुद्ध विहार येथे करण्यात आला. त्याप्रसंगी आयु-संदीप त्रिभुवन,आयु-प्रविण अल्हाट, बौद्धाचार्य आयु – गौतम गोडगे, भारतीय बौद्ध महासभा राहता तालुका अध्यक्ष आयु-मिलिंद दुनबळे संचालक साई संस्थान सोसायटी आयु-विजय खरात ग्रा. पत्रकार संघ अहिल्या नगर विश्वासराव जमधडे, रवींद्र शेजवळ, कैलास शेजवळ, आयु- गुणवंत पगारे सामाजिक कार्यकर्ते आयु-सुनील जगताप साहिल जाधव स्वाती ताई मोकळ , मंजुषा ताई साळवे, रोहिणी ताई महांकाळे, सुमनताई बनसोडे, भाऊसाहेब साबळे असे अनेक उपासक उपासिका व बौद्ध प्रेमी उपस्थित होते.
त्रिसरण पंचशील व बुद्ध आणि त्याचा धर्म ग्रंथवाचन झाले त्यानंतर बाल संस्कार म्हणजे बाल मनावर चांगले विचार मैत्री करुणा व शिस्तीचे बीज पेरणे या उद्देशाने बालकांना पंचशील व नैतिक मूल्याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच आयु-संदीप त्रिभुवन यांनी विपश्यनेवर विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी विशेष मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
तसेच *बुद्ध वंदना ग्रुप व सर्व बौद्ध बांधव* उपस्थित होते.
शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून एक वही व पेन देण्यात आले. आभार सोनवणे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे