Breaking
ब्रेकिंग

भैरवनाथ नगरला नवीन आरोग्य केंद्र सोबत ६५ लाख रु. कामाचे उद्घाटन

0 1 3 5 8 0

प्रस्ताव द्या,विकासकामांना निधी आणायची जबाबदारी माझी – मा.आ. भाऊसाहेब कांबळे

शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर येथे नवीन आरोग्य केंद्रासोबत पेव्हिंग ब्लॉक आणि स्ट्रीट लाईट अशा ६५ लाख रुपये कामाचे उद्घाटन मा.आ.भाऊसाहेब कांबळे, नगरसेविका सोनिया कक्कड, नगर सेवक दिपक वमने, लोकनियुक्त सरपंच दिपाली फरगडे, उपसरपंच चंद्रभागा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

भैरवनाथनगर ग्रामपंचायत स्थापनेपासून आरोग्य केंद्राचा प्रश्न प्रलंबित होता. लोकनियुक्त सरपंच सौ.दिपालीताई फरगडे यांनी या विषयाकडे लक्ष केंद्रित करून शासन दरबारी पाठपुरावा करून आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले. भैरवनाथनगर हद्दीत जागा उपलब्ध करून आरोग्य केंद्राच्या बांधकाम सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्यक्ष आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात झाली. या प्रसंगी मा.आ.भाऊसाहेब कांबळे म्हणाले “ भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.दिपाली फरगडे यांचे काम अतिशय चांगले आहे, त्यांनी भैरवनाथनगर ग्रामपंचायतीचा नावलौकिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर पोहचवला ” , नगर सेवक सोनिया कक्कड म्हणाल्या “ या भागात आरोग्य केंद्राची खरोखर गरज होती गरजू लोकांना दवाखान्यासाठी श्रीरामपूर किंवा निमगांव खैरी येथे जावे लागत होते, परंतु आता या गावातच दवाखान्याची सोय झाल्याने गरजू लोकांसाठी अतिशय चांगली सोय झालेली आहे. ” त्यानंतर प्रविण फरगडे म्हणाले “ आ.भाऊसाहेब कांबळे यांनी भैरवनाथनगर मध्ये कोट्यावधींची कामे केलेली आहेत. परंतु भैरवनाथनगर साठी रस्ते आणि गटारीसाठी अजून निधीची आवश्यकता आहे, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून गावासाठी अजून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली ” या मागणीवर आ.भाऊसाहेब कांबळे यांनी माझ्याकडे प्रस्ताव द्या निधी आणण्याची जबाबदारी मी घेतो असे सांगितले.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विमल थोरात, ज्योती लाहोरे, बेबीताई फरगडे, अलका वायकर, कांता शेळके, सीमा शिंदे, पांडुरंग लबडे, सौरव गवारे, प्रशांत लबडे, राहुल लिहिणार, ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा गोसावी, शीतल गोरे, पत्रकार विजया बारसे, धनश्री दाभाडे, अंगणवाडी सेविका योगिता गोरे, प्रमिला सुलाखे, आशा सेविका संगीता धिवर, दिपाली फरगडे, अनिता गायधने, यास्मिन शेख, आरोग्यसेविका बीटपल्लीवार, बिट्टू कक्कड, सुनील शिंदे, भारत तुपे, सुभाष शेळके, राजेंद्र फरगडे, संकेत फरगडे, संभाजी फरगडे, श्रीराम फरगडे, बबन लिहिणार, वसंत देवकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लोकनियुक्त सरपंच यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे