वंचित बहुजन आघाडी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निषेधार्थ जाहीर निवेदन
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून संविधान तयार करून आपल्या भारत देशाला २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त करण्यात आला. ते भारताचे संविधान २६ जानेवारी पासून अमलात आणण्यात आले. इतका मोठा व महान इतिहास असताना तरीही नाशिक येथे दिनांक २६ जानेवारी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो अशा संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
प्रजासत्ता दिन हा भारतीय संविधानाचा विजय दिन असून त्या संविधानाची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरच देशाची लोकशाही समानता सामाजिक न्याय व बंधुता यावर उभी आहे. अशा पवित्र दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळणे हा केवळ दुर्लक्ष नसून तो संविधानाचा व भारत देशाचा अपमान महामानवाचा अवमान व बहुजन समाजाच्या आत्मस्मानावर घातलेला थेट घाला असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. या कृतीला संविधानाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन सामाजिक न्यायव्यवस्थेचा अवमान व लोकशाही मूल्यावर आघात असल्याचे नमूद करत मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तात्काळ निषेध जाहीर माफी प्रशासकीय चौकशी व दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय स्तरावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
हे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम चित्ते युवा जिल्हा महासचिव सुनील वाघमारे तालुका उपाध्यक्ष विशाल पठारे महासचिव अण्णासाहेब मोहन भारती बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप सरचिटणीस संतोष बनसोडे यांच्यासह संजय महाले संतोष त्रिभुवन सुशील पठारे तनवीर मुबारक शेख किरण झाल्टे मनोज शिंदे सिद्धार्थ धनेधर प्रकाश सावंत सी एस बनकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही.




