Breaking
ब्रेकिंग

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी ते वणी पदयात्रा सोहळा मोठा आनंदात व उत्साहात पार पडला

0 0 4 2 4 0

सप्तश्रृंगी गड (प्रतिनिधी ) श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी वणी ते शिर्डी पदयात्रा सोहळ दि.11/01/2026 ते 14/01/2026 पर्यंत पदयात्रा सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला संस्थेचे कर्मचारी वृंद हे सर्व हे मोठा उत्साहाने सप्तशृंगी गडावर पोचून सप्तशृंगी आईचे दर्शन मोठ्या भक्ती भावाने घेतले प्रत्येक गावोगावी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून देवीची आरती व सत्कार केला दिनांक. 11/01/2026 रोजी दर्डे फाटा मगरे वस्ती या ठिकाणी सकाळचा नाष्टा तसेच पदयात्रा यांचा सत्कार करण्यात आला तसेच पालखी तर्फे मगरे सहकुटुंबाचा शाल श्री साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करून पदयात्री यांनी त्यांचे आभार मानले अकरा तारखेला संध्याकाळचा मुक्काम रुई (देवगाव) येथे श्री राम कृष्ण हरी वारकरी आश्रम या ठिकाणी झाला आश्रम चे ह. भ.प. श्री माऊली शिंदे महाराज यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत केले मोलाचे सहकार्य केले संस्थेचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार संचालक रामभाऊ गागरे सचिव विलास वाणी तसेच विजुभाऊ शिंदे यांनी संस्थेच्या पालखीला भेट देऊन ह. भ . प . श्री माऊली शिंदे महाराज यांच्या हस्ते पालखी ची आरती करण्यात आली तसेच मा.चेअरमन यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला व मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच दिनांक12/01/2026 रोजी दुपारी श्री गणेश कोल्हे उगाव यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत व जेवणाची व्यवस्था केली कोल्हे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच12/01/2826 रोजी तिसगाव येथील ह. भ. प . महंत राकेश गिरी महाराज तसेच श्री. मनोज शिरसाठ. सौ मानसी शिरसाट तसेच शिरसाट परिवाराने पालखीचे व पदयात्रेचे स्वागत करून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली. शिरसाट कुटुंबाच्या हस्ते पालखीचे पूजा व आरती करण्यात आली पदयात्री कडून त्यांचा शाल श्रीफळ साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या पालखी व पदयात्रे यांचे गावोगावी स्वागत करून मोलाचे सहकार्य केले. श्री साई संस्थान सोसायटीची पालखी सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात पार पडला. संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व संचालिका सचिव सहसचिव यांनी पालखीला सहकार्य केल्याबद्दल मानले आभार

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे