Breaking
ब्रेकिंग

पसायदान प्रीमियर लीग २०२६ चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री सुजय दादा विखे यांच्या प्रमुख उपस्थित शानदार शुभारंभ

0 1 3 5 8 0

नेवासा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली परिसरात श्री शिवा भाऊ पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पसायदान प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या प्रसंगी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचा स्वीकार करून मान्यवरांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विखे पाटील परिवाराच्या वतीने सर्व संघांना प्रेरणादायी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, ह.भ.प. महंत स्वामी गणेशानंद गिरीजी महाराज तसेच क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे