ब्रेकिंग
कर्नाटक राज्यातील उडपी येथील साई भक्त श्री बि.चंद्रशेखर किनी यांच्या कडून १ किलो२०४ ग्रॅम चांदीची मूर्ती साईचरणी अर्पण

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून वेगवेगळ्या प्रकारचे दान अर्पण केले जाते. आज कर्नाटक राज्यातील उडपी येथील साईभक्त श्री बी. चंद्रशेखर किनी यांनी श्री साईबाबांच्या चरणी श्री साईबाबा महाप्रसाद बनवतांनाची प्रतिमात्मक चांदीची मुर्ती अर्पण केली. सदर चांदीच्या मूर्तीचे एकूण वजन १ किलो २०४ ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत २ लाख १४ हजार ३१२ इतकी आहे. ही चांदीची मुर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने प्रशासकिय अधिकारी श्रीअतुल वाघ यांच्या हस्ते देणगीदार साई भक्त श्री बी. चंद्रशेखर किनी यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
0
1
3
5
8
0



