ब्रेकिंग
साई पॉईंट ऑटोमोबाईल्स प्रा.ली. ठाणे यांच्याकडून नऊ इलेक्ट्रॉनिक होंडा एक्टिवा दोन चाकी गाड्या श्री साईबाबा संस्थानला देणगी देण्यात आली

0
0
4
2
4
0
- शिर्डी (प्रतिनिधी). श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील लाखो भाविक विविध स्वरूपाच्या श्री साईबाबांच्या चरणी वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या देत असतात त्यातच आज 26 जानेवारी या दिवशी ठाणे येथील साई पॉईंट ऑटोमोबाईल्स प्रा.ली.चे दानशूर साई भक्त श्री दिलीप पाटील यांनी श्री साईबाबा संस्थानला नऊ इलेक्ट्रॉनिक होंडा एक्टिवा दोन चाकी वाहने देणगी स्वरूपात अर्पण केल्या . साई भक्त श्री दिलीप पाटील यांचे श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच नऊ गाडींची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी प्र. प्रशासकीय अधिकारी मा. श्री अतुल वाघ व प्र. जनसंपर्क अधिकारी मा. श्री दिपक लोखंडे आदी उपस्थित होते
0
0
4
2
4
0




